श्रीगोंदा प्रतिनिधी | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत
राज्य पुरातत्त्व विभाग नाशिक आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग अहमदनगर.जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसील कार्यालय श्रीगोंदा. यांचे मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याने आणि रक्ताने पुनीत झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पांडे पेडगावच्या भुईकोट किल्यावर , धर्मवीरगडावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताचा तिरंगा ध्वज फडकला आहे.
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी ही घटना घडली आहे.
तालुक्यातील शिवप्रेमींची, शिवभक्तांची अनेक वर्षांची ईच्छा पुर्ण झाली.
शनिवार दिनांक १३/०८/२०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता मा. मिलिंद कुलथे साहेब तहसीलदार श्रीगोंदा. यांचे हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वयंसेवक टीम” म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या शिलेदार टीमने परिश्रम घेतले.
याअगोदर किल्ले धर्मवीरगड येथे तालुका प्रमुख अक्षय गायकवाड यांच्या नियोजनात परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ऊंच व दाट वाढलेले गवत उपटून काढण्यात आले. ध्वजस्तंभाजवळील सर्व परिसर सफाई करण्यात आली. यावेळी शिवदुर्ग शिलेदार मावळ्यांच्या ६० जणांच्या टीमने झटून काम केले. ध्वजारोहण झाल्यानंतर मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
किल्ले धर्मवीरगडावर शिवकार्य व संवर्धन कार्य करणाऱ्या अनेक संस्थाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार मिलिंदजी कुलथे यांनी ध्वजारोहण केले. मारूती वागस्कर यांनी संचलन केले.
पेडगाव जुने शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत गायन केले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रामकृष्ण जगताप साहेब. गटविकास अधिकारी,मंगेशजी देवरे मुख्याधिकारी श्रीगोंदा नगरपालिका.डॉ नितीन खामकर, तालुका आरोग्य अधिकारी,कांगुणे साहेब उपअभियंता पंचायत समिती श्रीगोंदा,दत्ताजी जगताप अध्यक्ष दक्ष नागरिक फाऊंडेशन श्रीगोंदा .प्रा.ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा,नितेश शेळके: श्री.भगवान कणसे सरपंच पेडगाव, पत्रकार बाळासाहेब काकडे, गणेश कविटकर,रोहिदास पवार,हरिदास शिर्के, मा पंचायत समिती उपसभपति प्रतिभाताई झिटे, संगीता इंगळे, सुचित्रा दळवी, डॉ निलेश खेडकर,अशोक गोधडे,इरफान काझी,देविदास शिर्के,दादा मांडगे,बाशिरभाई काझी
आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका,गडपाल भाऊ घोडके, नंदकिशोर क्षिरसागर, पुरातत्त्व विभाग कर्मचारी मच्छिंद्र पंडित. एन.एस.एस.चे विद्यार्थी ,यांसह ३०० पेक्षा जास्त शिवप्रेमी, व स्थानिक पेडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे ६० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी पुरातत्व विभागाचे मार्गदर्शनाखाली नियोजन केले.
यावेळी बोलताना तहसिलदार मिलिंद कुलथे यांनी सांगितले की, स्वराज्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ऐतिहासिक वारसा असलेल्या पांडे पेडगावच्या भूईकोट किल्ल्याच्या इतिहासात प्रथमच भारताचा तिरंगा फडकावला आहे. यासाठी अनेकांनी सहकार्य केले. शिवदुर्गने ध्वजारोहण सोहळ्याचे सुंदर नियोजन केले.ही परंपरा शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराने यापुढेही अखंडित सुरू ठेवावी. यासाठी सर्व श्रीगोंदेकरांनी साथ द्यावी.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराने भारताचा अमृत महोत्सव निमित्ताने ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ध्वज फडकावला. किल्ले धर्मवीरगड, पानिपत विरांची शौर्यगाथा सांगणारी दिल्ली वेस श्रीगोंदा,चालुक्य कालीन वारसा असलेले सिध्देश्वर मंदिर लिंपणगाव.