टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२१ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आपला पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रातील महापुरुष सावित्रीबाई फुले महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांची अनेक वेळा अपमानास्पद वक्तव्य केलेली आहेत त्यांनी स्वतः अनेक वेळा आपल्या वक्तव्या विषयी सारवासारव करून वेळ मारू नेलेली आहे.
तरीही त्यांच्या वर्तणुकीत बदल होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याविषयी असंतोषाचे भावना आहे या सर्व घटनांवर वक्तव्याचा विचार करता त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागून पदाचा राजीनामा द्यावा छत्रपती क्रांती सेना विजयकुमार गायकवाड सचिन भोसले सुभाष बोराडे सुरेश रणवरे समीर शिंदे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांनी नायब तहसीलदार यांना पत्र देऊन आपली व्यथा मांडली कोशारी भविष्यात असंच बोलत राहिले तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा