टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि. २४ नोव्हेंबर २०२२ : दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी साईनगर, काष्टी येथील विक्रम राजेंद्र पाचपुते यांनी त्यांची युनिकॉर्न कंपनीची मोटार सायकल चोरी गेलेबाबत श्रीगोंदे पोलिसांकडे फिर्याद दिली असता त्यावर श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा क्रमांक ९३३/२०२२ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन घेतला.
सदरील गुन्ह्याचा तपास चालू असता श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना संशयित गुन्हेगारा बद्दल खात्रीशीर बातमी समजल्यानुसार गणेगाव, तालुका शिरूर येथील अक्षय नितीन काळे, वय २४ वर्षे यास ताब्यात घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचेवर जबाबदारी देण्यात येऊन त्याबरहुकूम सदर संशयीत इसमास वांगी, तालुका करमाळा येथुन ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. सदर चौकशीत अक्षय काळे याने काष्टी येथून नमुद मोटार सायकल चोरी केली असल्याबाबत कबुली दिली.
श्रीगोंदे पोलिसांनी आरोपीकडून होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल क्र. एम.एच. १६ बी. एस. २७५५ रक्कम रुपये तीस हजार किंमतीची ताब्यात घेतली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी अक्षय नितीन काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रांजणगाव, श्रीगोंदे, वालचंदनगर, दौंड, शिरूर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी विक्रम पाचपुते यांच्या फिर्यादीनुसार सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार झुंजार करीत आहेत. आरोपी काळे सध्या तुरुंगात असुन त्याचाकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
वरील गुन्ह्याच्या तपासाची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदरशनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले साहेब, पोलीस उप निरीक्षक समीर अभंग, सहायक फौजदार अंकुश ढवळे, पो. ना. गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव, प्रशांत राठोड यांनी केली.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा