टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२४ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये श्रीगोंद्यातील प्रतीक बलभीम काळेवाघ, पूजा बापूराव कचरे, अखिल हमीद शेख, किरण भास्कर वागस्कर, यांची राज्य कर निरीक्षक पदाची निवड झाली.
या परीक्षेमध्ये राज्यात एकूण दोन लाख ९१ हजार इतक्या विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरले होते यापैकी श्रीगोंदा तालुक्याचे चार विद्यार्थ्यांनी बहुमान मिळवला. एकाच तालुक्यातील चार जणांची निवड झाल्याने सर्व स्तरांमधून संपूर्ण तालुक्यामधून त्यांच्या वरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सर्व विद्यार्थी सामान्य व शेतकरी कुटुंबातले असून त्यांना मिळालेल्या यशाबद्दल श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा