टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२४ नोव्हेंबर २०२२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान भाग्यश्री फंड (५९ किलो ), पैलवान पल्लवी पोटफोडे ( ६८ किलो), पैलवान साक्षी इंगळे (५३ किलो ) यांनी आपआपल्या वजनगटामध्ये उल्लेखनीय कुस्त्या करून प्रथम क्रमांक मिळविला. या खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशस्वी खेळाडूंचे माजी मंत्री व विद्यमान आमदार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बबनरावजी पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीरशेट पटवा, माजी आमदार व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुलदादा जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के सीनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, कला शाखा प्रमुख डॉ.प्रकाश साळवे, ज्यूनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा.संजय अहिवळे, शा. शि. संचालिका प्रा. बागुल कल्पना, क्रीडा शिक्षक संजय डफळ, हनुमंत फंड व संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : आप्पा चव्हाण)