टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२५ नोव्हेंबर २०२२ : गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त जनाई प्रतिष्ठान तर्फे शेडगाव मधील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदाननगर (शेडगाव), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेटवस्ती (शेडगाव), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावतानगर (शेडगाव) या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ धेंडे हे नेहमीच लोक उपयोगी कार्यक्रम राबवत असतात त्यातच दिनांक २४ नोव्हेंबर रोजी खासदार सुजय विखेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शेडगाव येथील सर्व शाळांवर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले.
या कार्यक्रमासाठी अमोल शेलार (स्विय सहायक खासदार श्रीगोंदा),उजागरे (स्विय सहायक खासदार श्रीगोंदा), बजरंग जगताप (ग्रा.पं. सदस्य ),नामदेव शेंडे(सामाजिक कार्यकर्ते ),महेंद्र रणसिंग(माजी ग्रा.पं. सदस्य ),गणेश म्हेत्रे (उद्योजक), शंकर रसाळ (सामाजिक कार्यकर्ते ), रामदास रसाळ (मेजर),सुभाष भदे(शा.व्य. समिती. भदे मळा), महादेव बोरुडे (अध्यक्ष. शा.व्य. समिती. गोदाननगर), चंद्रकांत भदे (सामाजिक कार्यकर्ते ),देवीदास करांडे (सामाजिक कार्यकर्ते ),नाना भोसले (सामाजिक कार्यकर्ते ), सर्व शाळेतील शिक्षक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा