टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.२५ नोव्हेंबर २०२२ : महात्मा फुले कृषि विद्यापठांतर्गत साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथील कृषिदुत हर्षद पवार, सौरभ पवार,किरण पेलमहाले, कृष्णकांत फडतरे, संकेत राजोळे यांनी कृषि उत्पादनाची पॅकेजिंग आणि साठवणुक कशी करावी यावर मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले. मार्केटिंग आणि जाहिरातीच्या युगात पॅकेजिंग आणि साठवणुकीला मोठे महत्व आहे. पॅकेजिंगपासून शेतमालाला संरक्षण तर मिळतेच, शिवाय साठवणुकीचा वापर केल्यास किफायतशीर भाव सुध्दा मिळतो. यावेळी कृषीदुतांनी फळे , भाजीपाला आणि धान्य यांची पॅकेजिंग आणि साठवणुक कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्या अवलंबिनासाठी विविध प्रकारच्या पद्धती शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या.
या चर्चासत्रास साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के .एच.निंबाळकर ,कार्यक्रम अधिकारी प्रा.आर. एस . गोंधळी, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एस.बंडगर आणि विषय विशेषज्ञ प्रा. एस. ए.औटी यांचे मार्गदर्शन लाभले. या चर्चा सत्रास ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : महेशकुमार शिंदे)