टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२५ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न व श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, सदगुरू कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदूतांचे आगमन झाले असून गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी या कृषिदूतांचे स्वागत केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न असलेल्या सद्गुरू कृषि महाविदयालय मिरजगाव येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषिदूत अक्षय नागरगोजे,सिद्धांत उगले,अमेय मोरे,सिद्धार्थ कोळेकर,प्रवेश केवट, शुशांक पवार,जयेश जाधव हे १० आठवडे गावात राहून विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा उद्देश व रूपरेखा ग्रामस्थांना समजावून सांगितली आणि गावाचे एकूण क्षेत्रफळ, लागवडीखालील क्षेत्र व पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आदी बाबींवर सरपंचासोबत चर्चा केली. तसेच ग्रामसेवकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमास आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी गावचे सरपंच संध्याताई शेंडे, उपसरपंच सोनाली भदे, ग्रामविकास अधिकारी देवतरसे, विजय रसाळ,शाहुराज भोपळे ग्रामपंचायत सदस्य,शेडगाव वि.का. चेरमन लक्ष्मण रसाळ, दत्त वि.का.चेरमन राजाराम रसाळ,पोलिसपाटील कारभारी बेलेकर व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कृषिदूतांना श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगाव या संस्थेच्या अध्यक्षा सौ.कल्याणीताई नेवसे, संस्थापक शंकरराव नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, महाविद्यालयाचे समन्वयक प्रसाद पाटील, प्राचार्य .डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल विधाते,प्रा. शिवम यादव व इतर विषयतज्ञ प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा