टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.२६ नोव्हेंबर २०२२ : ग्राम सुरक्षा यंत्रणा गावोगावी कार्यान्वित झाल्यानंतर चोरी, दरोडा,आग,जळीताच्या घटना,लहान मुले हरवणे,शेतातील पिकांची चोरी,वन्यप्राणी हल्ला,गंभीर अपघात,पूर,भूकंप यासारख्या आपत्तीच्या घटनांमध्ये एकाचवेळी सर्व गावाला सूचना देणे,सावध करणे अथवा एकाचवेळी सर्वाना मदतीसाठी बोलावता येणे शक्य होणार असल्याचे सांगत याचे प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित नागरिकांना देण्यात आले.
- नागरिकांनी चोरी,दरोडा, अपघात यासारख्या व इतर संकटकाळात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या १८००२७०३६०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास चोरी, दरोडा, अपघात यासारख्या घटना घडत असतानाच फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला तात्काळ मदत मिळून पुढील नुकसान टाळता येते. यासाठी नागरिकांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊन आपले नंबर नोंदवावे व या यंत्रणेचा वापर करावा असे आवाहन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी केले.
सध्या ग्रामिण भागात चोऱ्या तसेच विविध अवैध व्यवसायाचे वाढते प्रमाण आहे. रोख रक्कम सोने चांदी यासह डाळींब,कापूस, कांदा या सारख्या पिकाचा चोरीत समावेश आहे.काही भागात चोरी, दरोडा, अपघात यासारख्या घडत असलेल्या घटनांवर मात करत मदत मिळविण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून एका फोन कॉलवर नुकसान टाळता येत असल्याचे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी सांगत कोळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात विविध उदाहरणे देत ग्रामसुरक्षा यंत्रणेची गरज व महत्त्व याची माहिती दिली.
यावेळी पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, क्राइम ब्रांचचे हसन शेख ,श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सर्वज्ञ मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र लगड व सुभाष लगड, विश्वास थोरात, कोळगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल काळे, उपसरपंच नितीन मोहारे, सदस्य विजय नलगे, अमित लगड, पंकज उजागरे, नागेश काळे, सोसायटीचे चेअरमन नंदकुमार लगड, व्हाईस चेअरमन जालिंदर साबळे, संचालक पद्माकर गाडेकर, गोरख घोंडगे, पोलीस पाटील शामराव धस , मेजर पोपट नलगे, बाळासाहेब लगड गुरुजी, जयराज लगड ,प्रकाश लगड, सतीश डुबल ,प्रतीक लगड, नितीन डुबल ,आबासाहेब लगड, नागेश लगड, ज्ञानदेव लगड, राजेंद्र लगड ,कृष्णा थोरात, गणेश गाडेकर, योगेश चंदन , उषाताई लगड,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : महेशकुमार शिंदे)