टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.३० नोव्हेंबर २०२२ : शनिवार दि.२६ नोव्हेंबर रोजी फिर्यादी शिवाजी रामभाऊ वागसकर वय ६३ वर्षे रा. वडाळी ता. श्रीगोंदा यांनी फिर्याद दिल की,दि.२६ नोव्हेंबर रोजी रात्री २.०० वा.चे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या किचनचा दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन त्यांना व पत्नीस गंभीर मारहाण करुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने व इतर वस्तू बळजबरीने चोरुन नेले आहे.
त्यानुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क.३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयाचा तपास चालु असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आदित्य कांतिलाल काळे रा. लिंबे जळगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद याने त्याचे दोन साथीदारांसह केला आहे. आरोपी अदित्य काळे याची माहीती काढली असता तो पिंपळगाव पिसा परीसरामध्ये असल्याबाबतची माहीती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा गावचे शिवारात कोंबिग ऑपरेशन करुन आदित्य कांतिलाल काळे वय २० वर्षे रा. लिंबे जळगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद यास ताब्यात
घेतले.
आरोपी आदित्य काळे कडे कसुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हा हा त्याने त्याचे दोन साथीदार लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे व आलुश्या उर्फ दिनेश रमेश काळे दोन्ही रा. मोहरवाडी ता. श्रीगोंदा यांनी केलेला आहे. गुन्हा करताना मोटार सायकलचा वापर केला आहे. आरोपी आदित्य काळे यास गुन्ह्यात अटक करुन मा.न्यायालकडुन
पोलीस कोठडी रिमांड घेतला आहे.
आरोपीकडुन सदर गुन्ह्यात चोरलेले १० ग्रॅम वजनाचे ५२०००/- रु. किंमतीचे सोन्याचे मणिमंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे. गुन्ह्यातील दोन आरोपी लंगड्या काळे व आलुश्या काळे फरार आहेत.
आरोपी आदित्य कांतिलाल काळे वय २० वर्षे रा. लिंबे जळगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद याचेवर वाळुंज पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क.379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
आरोपी लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे रा. मोहरवाडी ता. श्रीगोंदा याचेवर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क 395,397,120, बेलवंडी पोलीस स्टेशन येथे 302,379,34, चांदवड पोलीस स्टेशन नाशिक येथे 457,380 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी आलुशा उर्फ दिनेश रमेश काळे रा. मोहरवाडी ता. श्रीगोंदा याचेवर बेलवंडी पोलीस स्टेशन येथे 302,श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे 457,380, 461,380 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर हे करीत आहेत आरोपी हा पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वरील उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक मा. राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक मा. प्रशांत खैरेसाहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अण्णासाहेब जाधव साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सपोनि महेश जानकर, पोसई समीर अभंग, सफौ अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ रविंद्र जाधव यांनी केली आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा