टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१ डिसेंबर २०२२ : दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेत श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आले. १) कु.यादव प्रज्ञा रामप्रकाश इ.सहावी १४ वर्षे वयोगट कुस्ती प्रथम , २)जाधव प्रेम नितीन इ.दहावी १७ वर्षे वयोगट भालाफेक व गोळा फेक मध्ये प्रथम ३) निंबाळकर वेदांतराजे सच्चिदानंद इ.नववी सतरा वर्षे वयोगट ट्रिपल जंप द्वितीय ४) कु.वाळके सविता बाळू इ.दहावी १७ वर्षे वयोगट भालाफेक प्रथम ५) कु.रायकर अमृता शिवाजी इ. दहावी सतरा वर्षे वयोगट थाळी फेक द्वितीय.
वरील सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक राजेंद्र जामदार सर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी खेळाडूंचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घन:शामअण्णा शेलार तसेच संजय आनंदकर सर, प्रा.विलास जाधव सर, मोहनराव भिंताडे , प्रकाश निंभोरे, भाऊसाहेब खेतमाळीस ,मुख्याध्यापक जामदार सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंचा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा