टीम लोकक्रांती श्रीगोंदा दि.२० ऑगस्ट रोजी जोधपुर मारुती चौक श्रीगोंदा येथे माजी आमदार राहुल जगताप यांच्या आर जे ग्रुपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते सिने अभिनेत्री मानसी नाईक, यामध्ये तरुणांचा आलेला महापूर हा मोठ्या प्रमाणात केलेल्या लाइटिंग मध्ये मानसी नाईक च्या नृत्याविष्कारात व बहारदार लावण्यांचा कार्यक्रमात डीजे च्या तालावर अक्षरशा बेधुंद झाला होता.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा व श्रीगोंदा तालुक्यातील उमाजी नाईक मंडळातील गोविंदांनी साथ थर लावून दहीहंडी फोडून एक लाख अकरा हजाराचे पहिले बक्षीस जिंकले. तर दुसरे बक्षीस ढोकराई मित्र मंडळ व तिसरे बक्षीस बोरुडेवाडी क्रांती मित्र मंडळाने जिंकले.या कार्यक्रमात आरंभ ग्रुप मखरेवाडी,ससाणे नगर मित्र मंडळ, कौटिल्य अकॅडमी यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
विशेष करून तरुण वर्गामध्ये कमालीचे प्रसिद्ध असणारे माजी आमदार राहुल जगताप यांच्या आर जे ग्रुपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश पहावयास मिळाला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, माजी नगराध्यक्ष व गटनेते मनोहर पोटे या नेत्यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती सर्वपक्षीय नेत्यांची बांधलेली मोट पाहता २०१४ च्या विधानसभेची पुनरावृत्ती माजी आमदार राहुल जगताप करणार का? हे पाहणे येत्या विधानसभेला औत्सुक्याचे ठरणार!
या कार्यक्रमाचे आयोजन आर जे ग्रुपचे मंगेश सूर्यवंशी, वसीम शेख,ऋषिकेश गायकवाड,मिलिंद भोईटे व सदस्यांनी सुरेख केले होते.
स्त्रोत-(आयोजित कार्यक्रम)
अतिशय सुंदर बातमी.. खुप खुप शुभेच्छा