टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२ डिसेंबर २०२२ : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी संगमनेर या ठिकाणी संपन्न झालेल्या “शालेय जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये” श्रीगोंदा तालुका संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करीत घवघवीत यश संपादन केले. श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल ६ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे-
११ वर्षं खालील वयोगट- स्वयंम भोसले, शौर्य चव्हाण, १४ वर्षे खालील वयोगट- ओंकार गोरे, तसेच १७ वर्षे खालील वयोगटामध्ये- सुमित भोसले, सागर भुयार, तर १९ वर्षांखालील वयोगटात- श्रुती आनंदकर.या सर्व खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व खेळाडू जयेश व सिद्धार्थ आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
यशस्वी खेळाडूचे आमदार बबनराव पाचपुते, जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, घन:शाम अण्णा शेलार, राजेंद्र दादा नागवडे, मा.आमदार राहुल दादा जगताप, नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्षा ज्योती ताई खेडकर, प्राचार्य डॉ.सतिषश्चंद्र सूर्यवंशी, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, फिजीकल डायरेक्टर चोरमले सर, क्रीडा समितीचे अध्यक्ष बापूराव गायकवाड, उपाध्यक्ष महेश गिरमकर यांनी अभिनंदन केले आहे.यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा