टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.३ डिसेंबर २०२२ : महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय कॉलेज चा खो-खो खेळाडू ऋषिकेश काळे इयत्ता बारावी कला शाखेतील असुन त्याची महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रोहा (रायगड) येथे दिनांक ८ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केलेली असून या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा खो-खो संघात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून तो अहमदनगर जिल्हा खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ऋषिकेश च्या या यशाबद्दल माजी मंत्री व विद्यमान आमदार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बबनरावजी पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीरशेट पटवा, माजी आमदार व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुलदादा जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के सीनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, ज्यूनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक झिटे सर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा.संजय अहिवळे, शा. शि. संचालिका प्रा. बागुल कल्पना, क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा