टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.४ डिसेंबर २०२२ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी चे काम संथ गतीने चालू असल्या कारणाने पुढे चालणाऱ्या वाहनाच्या धुळीमुळे रोड अंदाज चुकल्याने काल शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे लातुर जिल्ह्यातील क्रुझर गाडीचा अपघात झाला. या अपघातात एका वॄध्द महिलेचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोरेगाव ता. रेणापूर जि लातूर येथील सहा जण देवदर्शनासाठी पुण्याच्या दिशेने जात असताना, आढळगाव येथील कुकडी मुख्य वितरिका क्र. १३ जवळ क्रुझर गाडी क्रमांक (एम एच २५ आर २०४५) पहाटे च्या सुमारास आली तर, समोरून गेलेल्या वाहनांमुळे मोठा धुरळा उडाल्याने अपघात ग्रस्त क्रुझर वाहनाच्या चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन कुकडी वितरिकेत जाऊन आदळले.
या अपघातात सुनिल सुतार, नलिनी सुतार, मंगल सुतार, गोदावरी पांचाळ, दिगांबर पांचाळ, अश्विनी पांचाळ हे जखमी झाले. अपघाताच्या आवाजाने शेजारी राहणारे डॉ. विठ्ठल दरवडे व हनुमान दरवडे इतर ग्रामस्थ यांनी जखमींना अपघातग्रस्थ वाहनातुन बाहेर काढले. घटनेच्या ठिकणी आत्यआवश्यक सेवा देणारी १०८ रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाली. डॉ. संजिवनी भागवत व चालक विशाल तरटे यांनी रुग्णांना प्रथमोपचार करून, पुढील उपचारासाठी दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान यातील जखमी ऐका जख़मी महिलेचा मृत्यु झाल्याचा समजते.
- अपघातला जबाबदार कोण ?
राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी जे काम सध्या संत गतीने चालू असून, सर्वत्र रस्ता खोदून ठेवला असल्याने वाहनांच्या येण्या-जाण्यामुळे धुळीचे डोंगर च तयार होतात. या धुळीमुळे दिवसा सुद्धा वाहन चालकांना रस्त्याचा अंदाजे येत नाही. रात्रीच्या वेळी वाहन चालकाला याचा खूप मोठा त्रास होतो व रोडचा अंदाज कळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे धूळ उडू नये म्हणून ठेकेदारांनी रस्त्यावर पाणी मारावे अशी ही नागरिकांमधून मागणी होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी नागरिकांमधून जोरदार मागणी होत आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा