टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.४ डिसेंबर २०२२ : श्रीगोंदा येथे अग्निपंख फाउंडेशन व अहमदनगर येथील सुरभि हॉस्पिटलने आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीरात १०० रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले त्यामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
या शिबीराचे उद्घाटन कुकडी साखर कारखान्याच्या संचालिका डॉ प्रणोती जगताप यांचे हस्ते करण्यात आले.
या शिबीरात हृदयरोग तज्ञ डॉ.अमित भराडीया, पोटविकार तज्ञ डॉ. वैभव अजमेरे, डॉ.अमित देशपांडे डॉ अमित पवार यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरात ह्रदय, उच्च रक्तदाब, लहान मुलांच्या हृदयाच्या समस्या, किडनी,प्रोस्टेट, मूत्रविकार, आतड्यांचे आजार, पोटाचे विकार रक्तातील साखर तपासणी, इ सी जी, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
डॉ प्रणोती जगताप म्हणाल्या कि अग्नीपंख व सुरभि हाॅस्पीटलने ग्रामीण भागात आरोग्य शिबीर रुग्णसेवेचा जागर केला आहे.
यावेळी दादासाहेब ढवाण अॅड गणेश शेंडगे प्रविण साळवे शुभांगी लगड दिलीप काटे मधुकर काळाणे अमोल गव्हाणे दत्ता जगताप माऊली उबाळे आदि उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : आप्पा चव्हाण)