महाराजा महाविद्यालयाचा बॉडी बिल्डर गणेश भोस याची विभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.५ डिसेंबर २०२२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत पाथर्डी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये गणेश माणिक भोस याने ८५ किलो वजन गटामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविला. अहमदनगर श्री साठी खूप चुरशीच्या लढती झाल्या. त्याची सी.डी. जैन महाविद्यालय श्रीरामपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या यशस्वी खेळाडूंचे माजी मंत्री व विद्यमान आमदार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बबनरावजी पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीरशेट पटवा, माजी आमदार व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुलदादा जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के सीनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, कला शाखा प्रमुख डॉ.प्रकाश साळवे, ज्यूनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा.संजय अहिवळे, शा. शि.संचालिका प्रा. बागुल कल्पना, क्रीडा शिक्षक संजय डफळ व संतोष जाधव, मंगेश जठार बिल्डर यांनी मार्गदर्शन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!