संभाजी ब्रिगेडच्या अहमदनगर जिल्हा-उपाध्यक्ष पदी अमोल बोरुडे यांची जाहीर निवड!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.०६ डिसेंबर २०२२ : मांडवगण गावचे सुपुत्र अमोल बोरुडे यांची अहमदनगर जिल्हा-उपाध्यक्ष पदी जाहीर निवड करण्यात आली असून या वेळी संभाजी ब्रिगेड चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस तसेच जिल्हा सचिव राजेंद्र राऊत,निलेश लंके प्रतिष्ठान चे श्रीगोंदा ता.अध्यक्ष सुभान तांबोळी यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर २०२२ रोजी संभाजी ब्रिगेड च्या श्रीगोंदा कार्यालयात पद वितरण करण्यात आले होते.

अमोल बोरुडे हे २०१६ पासून त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य संभाजी ब्रिगेड पक्षात निरंतर करत आले आहेत.या वेळी ते बोलताना म्हणले कि भरपूर लोकांचा गैरसमज आहे कि संभाजी ब्रिगेड हा पक्ष फक्त मराठा समाजाचा आहे खरतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणार्थ मोठ्या आदराने संभाजी ब्रिगेड हे नाव देण्यात आले असून या पक्षात सर्व जाती धर्मा चे कार्यकर्ते पदाधिकारी नि:स्वार्थी पणे सामाजिक आणी राजकीय कार्य करत आहेत. या ठिकाणी कसलाही भेद भाव केला जात नाही.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ऍड. मनोजदादा आखरे तसेच पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी फोन वर शुभेच्छा देऊन मांडवगण जिल्हा परिषद गट मजबूत करण्याची जवाबदारी सोपावण्यात आली तसेच पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!