टीम लोकक्रांती : श्रीगोंदे प्रतिनिधी : दि.०७ डिसेंबर २०२२ : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने ५ डिसेंबर रोजी हार्मोनि इंटरनॅशनल स्कुल, वडगाव गुप्ता अहमदनगर या ठिकाणी संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय किक-बॉक्सिंग स्पर्धेमध्ये श्रीगोंदा तालुका संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करीत नेत्रदीपक यश संपादन केले.
चौदा वर्षां खालील वयोगटामध्ये -४५ किलो वजन गटामध्ये ओंकार ननावरे या खेळाडूने तर १९ वर्षे खालील वयोगटामध्ये ८८ किलो वजनगटामध्ये नाहीद पठाण या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंची विभागीय शालेय किक-बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर यश पिपाडा, शैलेंद्र निषाद, ओंकार सोनवणे, स्वरांजली चोपडे रौप्यपदकाचे मानकरी ठरले. तसेच शबनम शेख, प्रसाद किंकर, यश खाकाळ यांनी कांस्यपदक मिळविले. सर्व खेळाडूंना जयेश आनंदकर व सिद्धार्थ आनंदकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे आमदार बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, घन:शाम शेलार, राजेंद्र नागवडे, मा.आमदार राहुल जगताप, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर, ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांनी अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा