टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१० डिसेंबर २०२२ : शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमधे श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप यांच्या माध्यमातून कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा येथील प्रणांगणामध्ये भव्य असा“वेध भविष्याचा विचार राष्ट्रवादीचा”संवाद मेळावा हजारो शेतकऱ्यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
अजितदादा पवार यांनी आपल्या शैलीमध्ये शिंदे फडणवीस सरकार वरती घनाघाती टीका केली महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मंजूर केलेल्या कामांना शिंदे फडणवीस सरकारने ती कामे बंद केली स्थगिती दिली असे गलिच्छ राजकारण यापूर्वी यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,विलासराव देशमुख,बाळासाहेब ठाकरे,शरदचंद्रजी पवार, यांनी विकासाच्या बाबतीत कधीही राजकारण केले नाही परंतु शिंदे-फडणवीस सरकारने कामे बंद करुन काय साध्य केले.
भाजपच्या सरकारने महापुरुषांचा अवमान करण्याचा जणुकाही विडाच उचलला आहे. राज्यपाल सारख्या महत्त्वाच्या पदावर असणारा व्यक्ती खालच्या पातळीवर भाष्य करतात महापुरुषांचा आव्हान करतात हे अशोभनीय आहे,पुण्याचे पालक मंत्र्यांनी तर कळसच केला आहे त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे अशा भाषेमध्ये अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांचा ही चांगला समाचार घेतला.
भाजपकडून होणाऱ्या महापुरुषांचा व महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान व भाजपचे नेत्यांचे बे लगाम वक्तव्याचे विरोधात,व राज्यपाल हटाव या विरोधात १७ डिसेंबर रोजी मुंबई मध्ये भव्य असे आंदोलन राष्ट्रवादी करणार आहे त्यावेळी सर्वांनी या आंदोलनांमध्ये भाग घ्यावा असेही आव्हान यावेळी अजित पवार यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाबद्दल अजित पवारांनी तर कपाळालाच हात लावला. तालुक्यामधील रस्त्याची दुरावस्था खूप दयनीय आहे “रस्त्यात खड्डे का खड्यात रस्ते” असा संतप्त टोलाही त्यांनी तालुक्याच्या आमदार बबनराव पाचपुते यांना लावला. शिंदे सरकार गुवाहाटीला जाऊन रेडे कापतात अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. शिंदे-फडणवीस सरकार सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतात जितेंद्र आव्हाड यांच्यावरती खोटे गुन्हे टाकले संजय राऊत यांना बेकायदेशीर रित्या अटक केली असे मत न्यायालयानी ही व्यक्त केले तसेच सीमा वादावरती मोठा वादंग चालू असताना शिंदे फडणवीस सरकार गप्प का आहे. असाही संतप्त सवाल करत अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार वरती जोरदार सडकून टीका केली.
यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप बोलताना म्हणाले श्रीगोंदा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या प्रश्नावर बोलणे टाळण्यासाठी आजारपणाचे सोंग आणले आहे. इतर कार्यक्रमांमध्ये २५ मिनिटे बोलतात पण तालुक्याचा फुटलेला विकासावरती बोलायचे गेलं तर आजारपणाचे सोंग आणतात. नेहमी तालुक्याच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचे राजकारण केले. मात्र आत्ता त्यांच्याच कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे ह्या जन्माचे ह्याच जन्मत फेडावे लागते ? अशी ही टीका राहुल जगताप यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर केली.
श्रीगोंदा तालुक्याला आमदार आहेत का नाही हे माहीत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी पाचपुते यांनी स्वर्गीय शिवाजी बापू नागवडे व कुंडलिक तात्या जगताप यांच्या आजारपणावर खालच्या पातळीवर टिका केली आता त्यांचे आजारपणावर बोलल्यावर त्यांना किती राग येईल ? असाही राहुल जगताप बोलताना म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम आण्णा शेलार, महाराष्ट्र राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब नाहटा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिदास आबा शिर्के, माजी पंचायत समिती सदस्य कल्याण ताई लोखंडे, संभाजीराजे दिवेकर, आबा पाटील पवार,शरद नवले, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा