श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१३ डिसेंबर २०२२ : सोमवार दि.१२ डिसेंबर रोजी युवासेना जिल्हाप्रमुख रविभाऊ वाकळे युवासेना जिल्हाप्रमुख अक्षयभाऊ कातोरे शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी नितीनभाऊ शिंदे यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे स्वागत आमदार शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुनील शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, विधानसभा संपर्कप्रमुख संजय खंडागळे यांनी केले
नितीन शिंदे हा तरुण ढवळगाव येथील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील कार्यकर्ता आहे बाल वयापासून नितीन हा शिवसैनिक म्हणून काम करीत आहे ही निवड झाल्याबद्दल नितीन यांनी आपली मत मांडत असताना श्रीगोंदा तालुक्यामध्ये युवा सेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व श्रीगोंदा तालुका शिवसेनेला लाभले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे शाखा घर तिथे युवा सैनिक ही संकल्पना घेऊन जाण्याचा मानस नितीन शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख, शिवसेना उप तालुका प्रमुख रावसाहेब डांगे, शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रकांत धोत्रे, शिवसेना उपतालुकाप्रमुख निलेश साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख निलेश गोरे, महिला आघाडी तालुका प्रमुख नूतनताई पानसरे, चांडगाव शिवसेना गावप्रमुख संभाजी घोडके, चांडगाव शिवसेना उपगाव प्रमुख रोहिदास मस्के, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पोटे, नगर युवासेना उपशहर प्रमुख पप्पू भाले ,गणेश लाटे, राजू तोरडे, सुनील शिंदे, व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा