टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.३ जानेवारी २०२३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्व देशभर हा दिवस ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. याच बालिका दिनाचे औचित्य साधून माळवाडी शाळेत शाळेतील सर्व आधुनिक सावित्री च्या लेकींचा सन्मान सोहळा रंगला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अद्वितीय कार्य कर्तुत्वाला मानवंदना देतानाच शाळेत शिकत असलेल्या सावित्रीच्या लेकी या आधुनिक भारताच्या भविष्याचे धडे गिरवत आहेत. म्हणून मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे या भावनेतून जयंतीनिमित्त मुलींचा सन्मान करण्यात आला.
मुलीदेखील मुलांपेक्षा कोठेही मागे नसून जर मुलगा एक घराचा वारस असेल तर मुलगी दोन्ही घरांचा सन्मान व आधार असते. तिला शिकवले पाहिजे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
शाळेतील सर्व मुलांचे विशेषतः मुलींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मुलींना औक्षण करताना त्या आई च्या डोळ्यात जो एक अभिमान दिसत होता तो पाहून उपस्थित पालकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या!!. सर्व माता पालकांनी केवळ स्वतः च्या मुलीलाच नव्हे तर सर्व मुलींना ओवाळले व आजचा सोहळा अधिक व्यापक बनवला.
यावेळी मुख्याध्यापक नितीन भोईटे सहकारी शिक्षिका माधुरी मंडले शालेय व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष प्रकाश भुजबळ,माता पालक संघाच्या अध्यक्षा मनीषा जाधव, रामदास भुजबळ,भीमराव भुजबळ व माता व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका माधुरी मंडले यांनी तर आभार मुख्याध्यापक नितीन भोईटे नितीन यांनी मानले.
लोकक्रांती वृत्तांकन