टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि. ८ जानेवारी २०२३ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी च्या सन २०२१-२२ मध्ये झालेल्या परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. ईश्वरी नितीन खेतमाळीस हिने २९८ पैकी २५८ गुण मिळवून उत्तम यश संपादन केले. तीने शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीगोंदा तालुक्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला.
ईश्वरी ही सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव खेतमाळीस यांची नात, कोळगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहरप्रमुख प्रविण खेतमाळीस, बाळासाहेब खेतमाळीस यांची पुतणी व कन्या विद्यालयाचे गणित शिक्षक नितीन खेतमाळीस व मराठी विषय शिक्षिका शितल राऊत यांची कन्या आहे. घरातूनच शैक्षणिक वारसा लाभलेल्या ईश्वरी लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची आवड आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तिने असेच उत्तुंग यश मिळविलेले आहे.तिच्या या यशाबद्दल तीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
लोकक्रांती वृत्तांकन