कु.सायली कोतकर हिने कुस्ती स्पर्धेत विभागीय स्तरावर पटकवीला तृतीय क्रमांक

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि ८ जानेवारी २०२३ : श्री कोळाईदेवी उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय, कोळगाव ची विद्यार्थिनी कु. सायली शिवाजी कोतकर हिने १ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षे वयोगटाखाली ५४ किलोग्रॅम वजनी गटात विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाचे व गावाचे नाव रोशन केले आहे.

अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे विभागीय स्तरावर तिच्याकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या .त्या अपेक्षांची पूर्तता करत तिने अतिशय चुरशीच्या सामन्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कोळगाव विद्यालयाच्या इतिहासात आत्तापर्यंत मुलींनी विभागीय स्पर्धेत धडक देऊन क्रमांक पटकविणे ही प्रथमच बाब घडलेली आहे. त्यामुळे तिने मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कु. सायली कोतकर या विद्यार्थिनीस क्रीडाशिक्षक श्रीमती.धिवर एम. बी व सौ. पाटकुलकर यांनीं मार्गदर्शन केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगडे एच के उपमुख्याध्यापक जंगले आर एस, पर्यवेक्षक धुमाळ बी. ए. श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लगड, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, कोणाचे सरपंच वर्षा काळे, उपसरपंच सारिका मोहारे सोसायटीचे चेअरमन नंदकुमार लगड, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रवीण खेतमाळी तालुका ओबीसी चे तालुका अध्यक्ष चिमणराव बाराहाते, कुकडीचे संचालक मच्छिंद्र नलगे, ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे ,संतोष मेहत्रे सर्व शालेय समिती सदस्य, पालक -ग्रामस्थ तसेच कोळगाव पंचक्रोशीने कौतुकाचा वर्षाव केला.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
66 %
10.1kmh
99 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
30 °
error: Content is protected !!