कोळगाव येथील आरोग्य शिबिराचा पाचशेच्या वर गरजूंनी घेतला फायदा

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रीगोंदा तालुका व लोक कल्याण आरोग्य केंद्र,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोळगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.११ जानेवारी २०२३ : हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रीगोंदा तालुका व लोक कल्याण आरोग्य केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोळगाव येथे बुधवार दिनांक ११ जानेवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये कोळगाव व परिसरातील गरजू पेशंटनी आरोग्य सेवेचा तर अनेक जणांनी दोनशे रुपयात चष्मा या संधीचा लाभ घेतला अशी माहिती शहराध्यक्ष प्रवीण खेतमाळीस व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष चिमणराव बाराहाते यांनी दिली.

खेतमाळीस व बाराहाते यांनी सांगितले की, हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. कोळगाव येथे झालेल्या शिबिरामध्ये ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी आरोग्य चिकित्सा करण्यात आली असून तीनशेच्या वर रुग्णांचे नेत्र परीक्षण करून त्यांना चष्मा व औषधे वाटप या शिबिरामध्ये करण्यात करण्यात आले.

सदर शिबिरामध्ये माजी सभापती पुरुषोत्तम लगड, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे, नितीन नलगे, नितीन डुबल, विश्वास थोरात, सुभाष लगड, हिरामण पवार, अनिल नलगे गुरुजी, तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, काकासाहेब देशमुख, बाळासाहेब शिरसाठ ,सयाजी लगड, बापूसाहेब रिसवाडकर, प्रवीण करपे, प्रतिभा धस व इतरांनी भेट दिली. तसेच कोळगाव शिवसेनेचे शुभम कार्ले, नंदकुमार लगड, राजू उजागरे , अंकुश लगड, दत्तात्रय धस ,अरिफ शेख, स्वप्निल हराळ व पठाडे सदस्यांनी या शिबिराचे यशस्वी नियोजन केले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
77 %
6.9kmh
100 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!