नागवडे कारखान्याच्या ७०९८ पात्र शेतकऱ्यांना सभासदत्व देण्यात आले आहे; चेअरमन राजेंद्र नागवडे

सभासदत्वाबाबत कोणीही चिंता करू नये अशी माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१५ जानेवारी २०२३ : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि. च्या सभासदत्वाकरिता पैसे भरलेल्या ७०९८ पात्र शेतकऱ्यांना सभासदत्व देण्यात आलेले असून त्यांना सभासद क्रमांक देऊन त्यांची नावे आय रजिस्टर मध्ये समाविष्ट करण्यात आली असल्यामुळे सभासदत्वाबाबत कोणीही चिंता करू नये अशी माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, कारखान्याचे भाग भांडवल वाढविणे गरजेचे असल्यामुळे कारखान्याच्या लेखापरीक्षक यांच्या शिफारशीनुसार कारखाना व्यवस्थापनाने माहे मार्च २०२१ मध्ये भाग भांडवल वाढविण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार कारखाना कार्यालयात खुल्या पद्धतीने इच्छुक शेतकऱ्यांना सभासदत्वासाठी रक्कम भरण्याचे व फॉर्म भरून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ७३२६ शेतकऱ्यांनी फॉर्म भरून सभासदत्वासाठी शेअरपोटी रकमेचा भरणा केलेला आहे.

इतक्या खुल्या व पारदर्शी पद्धतीने शेतकऱ्यांना सभासदत्व देणारा नागवडे सहकारी साखर कारखाना हा राज्यातील एकमेव कारखाना असल्याचे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, सदर शेतकऱ्यांच्या फॉर्म व इतर कागदपत्रांची छाननी पूर्ण होत आली असून पात्र ७०९८ ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे सभासद झालेले आहेत. त्यांची नावे कारखान्याच्या आय रजिस्टर मध्ये समाविष्ट करण्यात आलेली असून त्यांना आय क्रमांक दिलेले आहेत. याची माहिती साखर आयुक्त पुणे व प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांना दिलेली आहे. काही तांत्रिक कारणाने ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रांचीअद्याप पूर्तता झालेली नाही त्यांची पूर्तता करून घेत असून त्यांनाही सभासद करून घेतले जाईल. सभासदत्वापासून कोणीही वंचित राहणार नाही.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा घेऊन कारखान्याचे संचालक मंडळ काम करीत असून सभासदांशी कधीही प्रतारणा करणार नसल्याची ग्वाही देऊन सभासद शेतकऱ्यांनी कोणत्याही भुलथापांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक मंडळ सदस्य व कार्यकारी संचालक आरएस नाईक हे उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.4 ° C
21.4 °
21.4 °
96 %
7.5kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!