टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१६ जानेवारी २०२३ : दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत आहेत. पोलीस प्रशासन सुध्दा मोठ्या शिताफीने या गुन्ह्यांची उकल करत असतात. श्रीगोंदा बस स्टँड येथे श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून सदर गुन्हेगारास दि.१३ जानेवारी रोजी अटक केले आहे.
दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी ललित सुभाष गुगळे रा.श्रीगोंदा यांनी पोलीस स्टेशन श्रीगोंदा येथे फिर्याद दिली की, दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी आज्ञात चोरट्याने गुगळे यांच्या राहत असलेल्या घरासमोरुन त्यांची एच एफ डिलक्स मोटारसायकल चोरुन नेली आहे अशी फिर्याद दिल्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वरील गुन्हातील मोटारसायकल रविंद्र विठ्ठल पवार रा.साळवणदेवीरोड श्रीगोंदा याने चोरली आहे व तो श्रीगोंदा बस स्टॅन्ड वर येणार आहे. त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना श्रीगोंदा बस स्टॅन्ड येथे सापळा लावून दि.१३ जानेवारी २०२३ रोजी ४ वा.चे सुमारास सापळा लावुन संशयीत व्यक्ती रविंद्र विठ्ठल पवार रा. साळवनदेवीरोड यास ताब्यात घेतले.
त्याचेकडे मोटर सायकल चोरीबाबत कसुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचेकडुन गुन्ह्यातील एच एफ डिलक्स एम एच १६ ऐ के २६६६ मोटर सायकल व इतर गुन्हातील चोरी केलेल्या सहा मोटर सायकल एकुण २,३७,०००/- रु किंमतीच्या सात मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपी कडुन मोटार सायकल चोरीचे भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन आरोपीकडुन आणखी मोटारसायकल चे गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे .
गुन्हाचा तपास पोना/ बी.एल.खारतोडे करत आहेत.सदरची कारवाई मा.राकेश ओला पोलीस अधिक्षक,मा.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक,मा.आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पो.ना खारतोडे, पो.कॉ/पठाण, पो.कॉ/ नवसरे यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन