नागरी सुविधांसाठी नगरपरिषदे समोर संभाजी ब्रिगेड च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले…!

छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करून आंदोलनास प्रारंभ झाला.

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१६ जानेवारी २०२३ : सोमवार दि १६ जानेवारी २०२३ रोजी संभाजी ब्रिगेड कडून श्रीगोंदा नगरपालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.श्रीगोंदा शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,त्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने मागील अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. श्रीगोंदा नगरपरिषद मधील पदाधिकारी मात्र राजकारणात व्यस्त आहेत.असा आरोप संभाजी ब्रिगेड कडून यावेळी करण्यात आला.

खाली दिलेल्या समस्यांच्या माहितीनुसार मोठ्या संख्येने समस्या नागरिकांसमोर आहेत.अशी माहिती यावेळी देण्यात आली.
१) ऐतिहासिक दिल्ली वेस मांडवगण रोड चे तातडीने संवर्धन करणे, ढासळलेला बुरुज बांधकाम करणे.

२) डुकरांचा व मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करणे.

३)पारगाव रोड वरील अर्धवट काम केलेल्या ठेकेदारावर कारवाई सह सर्व १७ रस्त्यांचे खड्डे बुजवन्याचे काम तातडीने सुरू करणे.

४)महात्मा फुले गार्डन शेजारील अभ्यासिका व क्रीडा संकुलचे काम तत्काळ सुरू करणे..!

५) १७ रस्त्यांवरील पडलेले डिव्हायडर दुरुस्त करून माती भरून झाडे लावणे,रंग देणे व
बाजारतळातील लेडी नाल्यावरील पूलाचे बांधकाम (Cause Way) अद्याप केलेले नाही.तात्काळ सुरू करावे.

६) अंदाजपत्रक प्रमाणे १७ रस्त्यावरील कॅटआईज, लेन लाईन स्ट्रिप्स (पांढरे पट्टे), साईन
बोर्ड लावलेले नाहीत या वर तात्काळ कारवाई करण्यात यावी

७) १७ रस्त्यावरील डिव्हायडर लगतचि माती काढणे व मोकळ्या डिव्हाडर मधील ऊगवलेल्या बाभळी तोडणे.

८) मराठी मुलांची व मुलींच्या शाळे समोर व कॅनरा बँक समोरील वळणावर ज्या ठिकाणी गतिरोधक रंबल स्ट्रिप्स बसवणे आवश्यक आहे त्याचे सर्वेक्षण करून तात्काळ कारवाई करावी.

९)शहरातील वडाळी रस्त्यासह विविध ठिकाणच्या बस थांबा बांधकाम करण्या संदर्भात तातडीने कारवाई यावी.

१०)घनकचरा मध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमत्ता होत असल्याने यात सुधारणा करण्यासाठी नागरिकांन च्या तक्रारीचा तात्काळ निराकरण करण्यासाठी बहुउपयोगी मोबाईल अँप करणे गरजेचे आहे यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

११) शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज चे पेव फुटलेले आहे व त्यावर श्रीगोंदा न पा प्रशासन कुठलेही कारवाई करण्यास तयार नाही त्यामुळे शहर विद्रुपीकरण होऊन पालिकेला आर्थिक नुकसान होत असून त्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन ठोस कारवाई करण्यात यावी,यासाठी ब्रिगेड कडून पाठपुरावा सुरु होता.

यासर्व समस्यावर कारवाई साठी श्रीगोंदा नगरपालिके समोर सोमवार दि १६ जानेवारी २०२३ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी ढोरजकर यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

  • नागरी सुविधेपेक्षा पद संरक्षण आणि राजकारण यात सत्ताधारी गुंतले असल्याने शहर वाऱ्यावर सोडले आहे.खड्ड्यांमुळे कितीही अपघात झाले तरी त्यांना काही घेणे देने नाही.त्यामुळे जनतेने यांना धडा शिकवणे गरजेचे आहे.
    -टिळक भोस(जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड)
  • नागरी सुविधांचा बोजवारा उडला आहे.रस्ते, पाणी,वीज जर पालिका देऊ शकत नसेल तर, नगराध्यक्ष यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार शिल्लक नाही.
    -सतीश बोरुडे (शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड)

यावेळी टिळक भोस(जिल्हाध्यक्ष),सतीश बोरुडे (शहर अध्यक्ष),दिलीप लबडे(संघटक),झहीर जकाते (उदोजक),गणेश काळे ,शिवराज ताडे,अजय शेळके,प्रदीप ढवळे,सुभान तांबोळी (अध्यक्ष)निलेश लंके प्रतिष्ठान इ उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!