टीम लोकक्रांती
कोळगाव प्रतिनिधी | महेशकुमार शिंदे
दि.१७ जानेवारी २०२३ : श्री कोळाईदेवी माध्यमिक विद्यालय, कोळगाव या विद्यालयाचा शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अ श्रेणीमध्ये पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यालयाचा ९९.२५ टक्के निकाल लागला आहे.
शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये सन २०२२-२३ ला एकूण २५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अ श्रेणी मध्ये पाच विद्यार्थी, ब श्रेणी मध्ये दहा विद्यार्थी व क श्रेणीमध्ये नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. अ श्रेणीमध्ये लगड रामेश्वरी शशिकांत, लगड ऋतुजा युवराज, लगड सायली मारुती, मोळक समृद्धी वाल्मीक, टूले रोशनी दत्तात्रेय या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक गायकवाड डी टी व श्रीमती सरोदे पी व्ही यांनी मार्गदर्शन केले असून विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगडे एच के उपमुख्याध्यापक जंगले आर एस व पर्यवेक्षक धुमाळ बी ए सर्व शिक्षक वृंद, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्कूल कमिटी व माता पालक व शिक्षक पालक संघ यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन