टीम लोकक्रांती
लिंपणगाव प्रतिनिधी | नंदकुमार कुरूमकर
दि.१८ जानेवारी २०२३ : तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडील स्कूल आणि कौशल्या देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल श्रीगोंदा शाळेचा २०२२-२३ चा शासकीय इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल हा १०० टक्के लागला असून मागील पंधरा वर्षाची परंपरा कायम राखली गेली.
२० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यापैकी १४ विद्यार्थ्यांना ए ग्रेड आणि सहा विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाला या परीक्षेत उत्तूंग कमगिरी करणारे विद्यार्थी कदम पियुष ,धालवडे समृद्धी ,रामफळे सुजल, पांडुले समृद्धी ,पाचपुते साक्षी ,शेख जोया ,घालमे ओंकार ,कदम सानिका, कोठारी संस्कृती , सायली भोस,गावडे सोनाली ,सिद्ध पृथ्वीराज, घोलप सिद्धेश, देसाई मोक्ष ,पुराने भागवत ,थोरात प्रणव, सूर्यवंशी आदेश, काळे सर्वेश ,भुजबळ वैभव ,आनंदकर ओम.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका तथा संस्थेच्या विश्वस्त सौ अनुराधा नागवडे ,संस्थेचे निरीक्षक एस पी गोलांडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ नीतू दुलानी मॅडम, कला शिक्षिका सौ सोनिया आगळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
लोकक्रांती वृत्तांकन