टीम लोकक्रांती
लिंपणगाव प्रतिनिधी | नंदकुमार कुरूमकर
दि.१८ जानेवारी २०२३ : बुधवार दि.१८ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा व लोकनेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (बापू) प्रतिष्ठान श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानमालेचे १५ वे वर्ष आहे.
सालाबादप्रमाणे व्याख्यानमालेत अनेक व्याख्याते बौद्धिक ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात.संस्थेचे अध्यक्ष मा.राजेंद्रदादा नागवडे यांचे मार्गदर्शनपर प्रेरणेतून या व्याख्यानमाला होत आहेत. व्याख्यानमालेसाठी संस्था अध्यक्ष विश्वस्त यांचे मार्गदर्शन लाभते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकपर उद्भोधनात सदर व्याख्यानमालेचे उद्देश सांगताना बापूंच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आपल्या महापुरुषांचे विचार वैचारिक भूक भागवण्यासाठी किती महत्वाचे आहेत याची जाणिव उपस्थित विद्यार्थ्याना करुन दिली.
व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प गुंफण्यासाठी व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर उपस्थित होते.त्यांनी मार्गदर्शनपर उद्भोधनात जीवन जगण्याची कला या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी मातृत्व विचारांचा उलघडा करत संस्कार हे विचारातून जन्म घेतात, तेच विचार भविष्यातील त्यागाचा,कर्तव्याचा, धेर्याचा व कार्याचा आढावा निश्चित करत जीवनाला आकार प्राप्त करून देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून आवड निवड जोपासली पाहिजे व ज्ञानाची उंची वाढवत आत्मविश्वासाने वाटचाल करत यश संपादन केले पाहिजे असा उपदेश दिला.
आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्षा काँग्रेस अनुराधा नागवडे यांनी भूषविले होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात महर्षी शिवाजीराव नागवडे उर्फ बापूंच्या कार्याचा आढावा घेतला. बापूंनीही कष्टाला व सामाजिक हिताला देव मानले होते.त्यांच्या कार्याचे संचित भविष्यातील यश मिळण्यासाठी खूप मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन केले.
या व्याख्यानासाठी संगीता निंबाळकर, संचालक भिमराव लबडे, संचालक प्रा.सुरेश रसाळ,माने सर,नेटके सर,सोनाली जामदार महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.शंकर गवते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धर्मनाथ काकडे यांनी केले.
लोकक्रांती वृत्तांकन