टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२० जानेवारी २०२३ :
दिनांक ०३ जानेवारी २०२३ रोजी प्रशांत उत्तम शिपलकर रा. तावरेवस्ती गार ता. श्रीगोंदा यांनी पोलीस स्टेशन श्रीगोंदा येथे फिर्याद दिली की. दिनांक ०३ जानेवारी २०२३ रोजी कोणीतरी आज्ञात तीन चोरट्याने फिर्यादी यांचे राहते घरातप्रवेश करून घरातील रोख रक्कम व चांदीचे पैंजन चोरुन नेले आहे त्यावेळी फिर्यादी यांचे वडील यांना चाकू मारून दुखापत केली होती. पोलीस स्टेशनला ०५/२०२३ भा.द.वि.क ३९४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दाखल गुन्ह्याचे अनुशंघाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्हेगार वस्त्या चेक करण्यास सांगीतले होते. दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी तळवडी ता.कर्जत येथे कोंबीग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगार आकर्शन नवनाथ पवार रा. खडकी जिल्हा पुणे यास ताब्यात घेतले होते त्याचेकडे गुन्ह्याबाबत कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदारांसोबत जबरी चोरी व घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेले ३५००/- रुपये व २००००/- रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजानाचे सोन्याचे गंठण असा एकुण २२५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडुन आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.अटक आरोपी याचेवर दरोडा व जबरी चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे गुन्हाचा तपास पो.स.ई. समिर अभंग व पो.ना./गाडे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पो. स.ई. समिर अभंग, स.फौ. ढवळे, पो.ना/ईगावले, पो.कॉ/अमोल कोतकर, पो.कॉ/देवकाते, पो.कॉ/साने, पो.कॉ/रविंद्र जाधव यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन