टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२२ जानेवारी २०२३ : शनिवार दि.२१ रोजी सायंकाळी ७ वा. हॉटेल पिकनिक पॉइंट मखरेवाडी,श्रीगोंदा येथे पत्रकार दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरदक्षिण चे खासदार सुजय विखे व विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांचा बुके,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
दर वर्षी६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या कडून थोडा उशिराने हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार या कार्यक्रमास उपस्थिती होते.
यावेळी खासदार सुजय विखे बोलताना म्हणाले कामाचा मोठा व्याप असल्याने मतदार संघातील सर्वच ठिकाणी कार्यक्रमांना नाही जाता येत परंतु आत्तापर्यंत मोठ्याप्रमाणात विकास निधी मंजूर करण्याचे काम केले आहे. आता केंद्रात आणि राज्य भाजप सरकार असल्याने अजून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करण्याचे काम करणार आहे. मला एकच पत्नी असल्याने मुक्कामी मला घरीच जावा लागते असे म्हणताच सर्वत्र एकच हशा पिकला.
विक्रमसिंह पाचपुते म्हणाले मी आता कोणत्याही निवडणुकीसाठी इच्छुक नाही. तुम्ही तालुक्यात असूनही दिसत नाहीत असं विचारताच ते म्हणाले ज्याचं जळतं त्यालाच कळतं परंतु आता आमचं सरकार असल्याने जे कामे होतील ते खासदार आणि आमदार यांच्याकडूनच होतील यात काही शंका नाही.
यावेळी जेष्ठ पत्रकार संजय काटे, बाळासाहेब काकडे यांनी मनोगत व्यक्त केले आणि काही सूचनाही केल्या. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे यांनी श्रीगोंदा शनिचौक परिसरात पत्रकार भवनाच्या कामा संदर्भात प्रश्न उपस्थित केला व खासदार यांच्या कडे मागणी ही केली त्यावर खासदार सुजय विखेंनी सांगितले की अशी काही तरतूद असेल तर मला सांगा मी या कामात नक्कीच मदत करेल असा शब्द त्यांनी दिला.
या कार्यक्रमास भगवान पाचपुते, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब महाडिक, बापू गोरे, संग्राम घोडके, गणेश झिटे, राजेंद्र उकांडे आणि इतर मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन