टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२३ जानेवारी २०२३ :
दिनांक ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी सचिन सदाशिव राहिंज रा.राहिंजवाडी काष्टी ता. श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की दिनांक ०२/०२/२०२१ रोजी आरोपीनामे राजु ऊर्फ अंकुश उमाजी चव्हाण याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे राहते घरी नोकर म्हणुन काम करीत असताना फिर्यादीची डिसकव्हर कंपनीची मोटार सायकल व एक मोबाईल असा मुद्देमाल चोरुन नेला आहे वगैरे. या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ९३/२०२१ भादवि कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयातील आरोपी हा गुन्हा घडलेपासुन फरार होता. आरोपी याचे मुळ गावी ढवळकेवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे वेळोवेळी जावुन पोलीस पथकाने शोध घेतला असता आरोपी मिळुन येत नव्हता. आरोपीचे मुळ गावी एक गुप्त बातमीदार तयार करुन त्याचे मार्फतीने पोलीस माहित घेत असताना तो आरोपी हा त्याचे मुळ गावी आल्याबात गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, यांचे आदेशाने पोना/१६४५ मोरे व पोकों साखरे यांना ह्या गुन्हयाचे तपासकामी आरोपीचे मुळ गावी जावुन शोध घेणेबाबत आदेशीत केले होते. आरोपीचे मुळ गावी जावुन शोध घेत असताना आरोपीचा मोबाईल क्रमांकाचे आधारे त्याचे लोकेशन परळी वैजीनाथ रेल्वे स्टेशन येथे आल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडुन गुन्हयाचे तपासात ह्या गुन्हयात चोरलेली डिसकव्हर कंपनीची १०० सी सी मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. नमुद आरोपी हा पोलीस कस्टडी मध्ये असुन त्याने अशा प्रकारचे आणखी कोठे गुन्हे केले आहेत का याबाबत तपास चालु आहे.
ह्या गुन्हयाचा तपास सफी गावडे पोकॉ साखरे हे करीत आहेत.ही कारवाई मा.राकेश ओला पोलीस अधिक्षक, मा.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक, मा.आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहा. फौजदार गावडे, पोना/ गुलाब मोरे, पोकॉ साखरे, पोकॉ आढागळे, प्रशांत राठोड यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन