टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२३ जानेवारी २०२३ : सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष श्रीगोंदा यांच्याकडून छञपती शिवाजी महाराज चौक श्रीगोंदा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्रीगोंदा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. शुभांगीताई पोटे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, सुरेश देशमुख, संतोष खेतमाळीस, निलेश साळुंके, रावसाहेब डांगे, कृष्णा भालेराव ओमकार शिंदे सागर खेडकर संदिप शिंदे हरिभाऊ काळे संभाजी घोडके महेश पोळ रोहिदास म्हस्के चंद्रकांत धोञे नितिन लोंखडे सुदाम सांवत नुतनताई पानसरे दिलिप पोटे सोमनाथ धोञे इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेला शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी या कठीण प्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देऊन ताकद देण्याचे आवाहन तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना केले.
लोकक्रांती वृत्तांकन