टीम लोकक्रांती
कोळगाव प्रतिनिधी | महेशकुमार शिंदे
दि.२४ जानेवारी २०२३ : हिंदूहृदय सम्राट, शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन कोळगाव मध्ये मोठ्या उत्साहात कोळगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपसभापती बाळासाहेब नलगे होते.
शिवसैनिक सच्चा कार्यकर्ता असून स्व.बाळासाहेब ठाकरे वर नितांत प्रेम करणारा आहे. अनेक हाल अपेष्टा सहन करून, जिवाचे रान करून शिवसैनिक शिवसेनेला, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहे. हीच मावळ्यांची फौज एकत्र करून ठाकरे यांनी शिवसेनेचे बीज रोवले व शिवसेनाला सत्ता स्थानापर्यंत पोहोचवले असे प्रतिपादन बाळासाहेब नलगे यांनी कोळगाव शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती आज अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी अध्यक्षपदावरून बोलतना केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष चिमणराव बाराहाते यांनी केले. या कार्यक्रमात माजी उपसरपंच नितीन नलगे, अमित लगड ,डी एल लगड ,झेंडे महाराज, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, शुभम कार्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण खेतमाळीस यांनी तर सूत्रसंचालन महेशकुमार शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमास सरपंच अमोल काळे,उपसरपंच नितीन मोहारे, ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे, संतोष मेहत्रे, सोसायटीचे चेअरमन नंदकुमार लगड, व्हाईस चेअरमन जालिंदर साबळे, सुयश जाधव, बापूसाहेब कर्डिले, बाळासाहेब शिरसाठ, राजू उजागरे, दत्तात्रय धस, गोटू उजागरे, पोपट खेतमाळीस, नितीन लगड, सुनील दळवी, रामदास शिंदे, नंदकुमार लगड सर ,अनिल नलगे सर, प्रसाद शिंदे, कल्याण नलगे, भोईटे शुभम कोतकर, पवार सर, आप्पा मेहत्रे, ओंकार नलगे, सनी धस, पठाडे संदीप दिवेकर, दादा राऊत, हेमंत पिसाळ , दत्तात्रय कर्डिले,संजय फिटर ,बाळासाहेब मोहारे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन