टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२६ जानेवारी २०२३ : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक – २०२३
मतदारांना मतदान केंद्र शोधणे बाबतची लिंक जिल्हयाच्या वेबसाईटवर प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोग यांचेकडील प्रेसनोट दिनांक २९ डिसेंबर २०२२ वरील विषयाबाबत कळविले आहे की, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक – २०२३ चा कार्यक्रम जाहीर झालेला असुन, दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.
पदवीधर मतदार यांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडण्यात आलेले आहे याबाबत शोध घेणे सुलभ होण्याकरीता मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक देण्यात आलेली आहे.
अशा सूचना सहा. निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपआयुक्त (सामान्य), नाशिक विभाग रमेश काळे यांनी दिलेल्या आहेत.
लोकक्रांती वृत्तांकन