कापूस वायदेबाजार सुरू होण्यास नवीन अडथळा

सेबीने दिली मान्यता पण पीएसी ने घातला खोडा

टिम लोकक्रांती
लिंपणगाव प्रतिनिधी | नंदकुमार कुरूमकर
दि.२६ जानेवारी २०२३ : सेबीने कापूस गाठीचे वायदे सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी कापूस उत्पादन सल्लागार समितीने व्यापार सुरू करण्यास विरोध केल्यामुळे आणखी काही काळ कापूस गाठीचे वायदे बंदच राहणार असल्याचे माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली आहे.

स्वतंत्र भारत पार्टी व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली, सात शेतीमलांवर लादलेली वायदेबंदी उठविण्यासाठी दि.२३ जानेवारी रोजी धरणे आंदोलन केले होते. त्याच बरोबर कपाशीच्या वायद्यांवर ही घातलेली तात्पुरती बंदी हटवावी ही मागणी हाती. आंदोलकांच्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या चर्चेत सेबीने कपाशीच्या वायदे सुरू करण्यास मान्यता ( अप्रुव्हल) दिली असल्याचे सांगितले होते. दि. २३ जानेवारी या आंदोलनाच्या दिवशीच कापूस उत्पादन सल्लागार समितीची, एम सि एक्स बरोबर बैठक झाली. या बैठकीत सल्लागार समीतिने, कापसाचे वायदे सुरू करण्यास ही योग्य वेळ नसल्याचे सांगितले. इच्छा असुन ही एम सी एक्स ला कपाशीचे वायदे सुरू करता आले नाहीत.

वायदेबाजारात व्यापार केला जाणाऱ्या सर्वच वस्तूच्या व्यापराबाबत एम सी एक्स ला सल्ला देणाऱ्या समित्या आहेत तशीच कपाशीसाठी सुद्धा प्रॉडक्ट अडव्हासरी कमिटी आहे. या समितीत प्रामुख्याने वस्त्रोद्योगतील संस्था किंवा संघटना आहेत, ग्राहक संघटना आहेत मात्र शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व नसल्यात जमा आहे. ऍग्रोस्टार व ऑल इंडिया कॉटन ग्रोअर असोसिएशन ही एफ पी ओ आहेत पण त्या थेट शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत व त्यांचा आवाज ही क्षीण पडताना दिसतो आहे.

कापसाचे वायदे सुरू करण्यासाठी सेबीने मान्यता दिली असली तरी एम सी एक्स च्या कार्य प्रणालीत काही सुधारणा सुचविल्या आहेत. या सुधारणा करून व्यापार तातडीने सुरू व्हायला हवा. वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांनी टेक्स्टाईल अडव्हासरी ग्रुप नावाची एक समिती तयार केली आहे व ही समिती कापूस वायदे बाजाराला मार्गदर्शन करते. या समितित ही शेतकरी प्रतिनिधी नाही. असे असेल तर निर्णय नेहमीच वस्त्रीद्योग व ग्राहकांच्या बाजूने होतील. या समितीत सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असायला हवेत असे मत घनवट यांनी व्यक्त केले.

कपाशीचे वायदे सुरू होण्यास दिरंगाई होत असल्याने कापूस उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने सध्या कापूस विकणे थांबवले असले तरी ते फार काळ थांबू शकत नाहीत. सेबीने मान्यता देऊन ही वायदेबाजार सुरू न झाल्यामुळे कापसाचे दर आणखी घसरले आहेत. शेतकरी व एकूणच कापूस व्यापाराच्या हितासाठी एम सी एक्स ने आवश्यक त्या सुधारणा करून व्यापार सुरू करावा. देशाचे वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून वायदे बाजार सुरू करावा अशी विनंती स्वतंत्र भारत पार्टीच्यावतीने इमेल पाठवून पियुष गोयल यांना करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी पासून कपाशीच्या गाठीच्या वायद्यांना सुरुवात न केलायस स्वतंत्र भारत पार्टी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात आंदोलन सुरू करेल असा इशारा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.9 ° C
23.9 °
23.9 °
80 %
5.3kmh
100 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
23 °
Sun
25 °
Mon
26 °
error: Content is protected !!