श्रीगोंदा पोलीसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.३० जानेवारी २०२३ :
पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब अहमदनगर यांनी गावठी हातभट्टी व अवैध दारु, जुगार यावर कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले आहे. त्याअनुशंगाने श्रीगोंदा तालुक्याचे हद्दीमध्ये कारवाई करणेकरिता तीन पथके तयार करण्यात आली आहेत. दि. १ जानेवारी पासुन २९ जानेवारी २०२३ पर्यंत श्रीगोंदा शहर, काष्टी, श्रीगोंदा कारखाना, जामदार मळा, शंकरनगर पेडगाव, हिरडगाव फाटा, आनंदवाडी येथे गावठी हातभट्टी व अवैध दारु याबाबत माहीती काढुन विशेष मोहीम राबविली व विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.

गावठी हातभट्टी व अवैध दारुवर रेड करुन ३८ आरोपीविरुध्द मुंबई दारुबंदी कायद्यान्वये ३५ गुन्हे दाखल करुन २१९५१०/-रु.मुद्देमाल नाश/जप्त करण्यात आलेला आहे. जुगार संदर्भात १३ आरोपींविरुध्द २ गुन्हे दाखल करुन ४२००/-रु. मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माहीती काढुन सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर छापे टाकुन समुळउच्चाटन करण्याची धडक कारवाई चालु आहे.

सन-२०२२ मध्ये पोलीस हद्दीमध्ये श्रीगोंदा शहर,काष्टी व इतर गावामध्ये वेळोवेळी गावठी दारु हातभट्टी विक्री, देशी दारुवर रेड करुन २६२ आरोपींवर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये २५९ गुन्हे दाखल करुन १२,७१,८५९/-रु. चा मुद्देमाल नाश/जप्त केला आहे. जुगार संदर्भात रेड करुन १३६ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ५० गुन्हे दाखल करुन ५,१४,६०३/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहा.पोलीस निरीक्षक महेश जानकर, समीर अभंग, अमित माळी, सुनिल सुर्यवंशी पो.उप.निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.9 ° C
23.9 °
23.9 °
81 %
8kmh
100 %
Mon
27 °
Tue
27 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
29 °
error: Content is protected !!