टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.३१ जानेवारी २०२३ : मंगळवार दि ३१ जानेवारी २०२३ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी श्रीगोंदा शहरातील महाविद्यालय व शाळा यांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची विद्यार्थींनींच्या छेडछाड व सुरक्षेच्या उपाय योजना संदर्भात मिटींग घेतली. मिटींग मध्ये विद्यार्थांच्या संदर्भातील समस्या जानुन घेऊन चर्चा करुन योग्य ते मार्गदर्शन केले.
२७ जानेवारी रोजी श्रीगोंदा शहरात झालेल्या मूक मोर्चा नंतर बऱ्याच प्रमाणात शासकीय यंत्रणेची सुत्र हालले आहेत त्याचाच परिपाक म्हणून शहरातील अवैध धंदयांवर छापे मारी करून अंकुश लावला गेला. रोड रोमीयों पासून विध्यार्थ्यांना होणारा त्रास व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी या मीटिंग चे आयोजन केले होते. या मिटींग करीता महाविद्यालय व शाळा यांचे १५ ते १६ प्राचार्य व मुख्याध्यापक हजर होते.
लोकक्रांती वृत्तांकन