नाशिक पदवीधर निवडणुकीत श्रीगोंद्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सोडली साथ!

उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने श्रीगोंद्यात एकाकी लढवली खिंड!!

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.३१ जानेवारी २०२३ : नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीमध्ये शुभांगीताई पाटील या महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावरती निवडणूक रिंगणात उभ्या होत्या. परंतु श्रीगोंदा तालुक्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेते व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोळे झाक करून शुभांगी ताई पाटील यांना साथ दिली नाही. उलट पक्षी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे काम करताना दिसले.

श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या नऊच्या-नऊ बूथ वरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या जिगरीने खिंड लढवत होते परंतु त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी साधे फिरकलेही नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के श्रीगोंदा शहरातील बुथ ला सदिच्छा भेट दिली

श्रीगोंदा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या साखर सम्राट व शिक्षण सम्राटांनी गुप्तपणे तांबे यांचे काम करण्यास सांगितल्याचे जाणवले. देशाचे नेते शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, यांनी आदेश देऊन सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी ताई पाटील यांचे काम केले नाही.

महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी श्रीगोंदा या ठिकाणी केलेल्या या “कहीपे निगाहे, कहीपे निशाना” कृत्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, तालुका संघटक सुरेश देशमुख, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, उपतालुकाप्रमुख निलेश साळुंके काष्टी येथील डॉ कोकाटे राज्य टीचर असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष आशाताई सुद्रिक उप तालुका अध्यक्ष घोडके मॅडम ओमकार शिंदे जमीर भाई शेख प्रवीण खेतमाळीस नितीन शिंदे संकेत सांगळे नूतन पानसरे संतोष चिकलठाणे , चिमणराव बारहाते सागर खेडकर शिवाजी राऊत व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील पदवीधर निवडणुकीतील सर्व बूथ वरती शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत ठेवले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अतिशय निष्ठेने नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये शुभांगीताई पाटील यांचे काम केल्याबद्दल शुभांगीताई पाटीलांनी तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!