श्रीगोंदा येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटप!

गरीबांच्या कल्याणा करिता मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प- डाॅ.सुजय विखे पाटील

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधि | दि.५ फेब्रुवारी २०२३ : देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली मात्र गोरगरीब एवढेच नाहीतर जेष्ठ नागरिकां करिता विशेष योजना आणून त्याचा लाभ थेट लाभार्थांना देणारे पहिले पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच आहेत, येणाऱ्या काळात त्यांनाच पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्धार आपल्याला करावयाचा असल्याचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी जेष्ठ नागरिकासह व्यक्त केला. ते रविवार दि.५ रोजी श्रीगोंदा येथील तुलसीदास लॉन्स येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते हे होते तर व्यासपीठावर नगराध्यक्ष शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर, गटनेत्या छाया गोरे, प्रतापसिंह पाचपुते यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना खा. विखे म्हणाले की गोरगरीब जनतेचा सातत्याने केवळ विचार नाही तर त्याकरिता चांगली योजना आखून ती लाभार्थां पर्यंत पोहचविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र काम करत असतात, एवढेच नाहीतर ज्या जेष्ठ नागरिकांना त्यांची मुले विचारात नाही अशा जेष्ठ नागरिकांचा ही मोदींनी विचार करून त्यांच्यासाठी देखील राष्ट्रीय वयोश्री ही योजना कार्यान्वित केली, आणी ती यशस्वीपणाने राबवली.

  • लाभार्थ्यांच्या ठळक प्रतिक्रिया :
  • जनाबाई राजाराम खेतमाळीस,श्रीगोंदा- योजनेतून काठी, कमोड, कमरेचा बेल्ट मिळाला असून वय झाल्याने निट चालता येत नाही, आता या काठीने चालता येईल..!
  • अंबादास नरहर काळे,श्रीगोंदा-मला वयोमानानुसार दिसायला कमी दिसत होते, चष्मा लागत होता परंतु ते घ्यायला अडचण होती, ती अडचण दूर झाली असून त्या बरोबरच फिरण्यासाठी व्हिल चेयर पण मिळाली, मोदी साहेबांचे, दादांचे आभार.
  • दत्तात्रय सोनु हजारे,श्रीगोंदा-घरची परिस्थिती चांगली नाही त्यामुळे उतारवयात फिरण्यासाठी लागणारी तीन चाकी सायकल घेऊ शकत नव्हतो परंतु या योजनेतून मिळाली त्याबद्दल सरकारचे आभार

या योजनेतून अहमदनगर जिल्ह्यास ४२ कोटी रूपयांचा निधी आला आणि जिल्ह्य़ातील हजारो जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता आला, वीस हजार रूपयांचे जेष्ठ नागरिकांचे साहित्य एका एका जेष्ठ नागरिकास यास या योजनेच्या माध्यमातून मिळाले आहे असे सांगून ते म्हणाले की सर्व समावेशक आणि सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन मागील आठ वर्षांपासून मोदी हे काम करत आहेत. आता तर फक्त आपल्याच देशात नव्हे तर जगात त्यांच्या कामाचा बोलबाला आहे. जगाने त्यांना सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून पंसती दिली आहे. अशा नेत्याला आपण ही पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून देण्याचा संकल्प हात उंचावून करू.

राज्यात सत्तातंर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर तीनच महिन्यात अनेक रखडलेले प्रकल्प आपण पुन्हा सुरू केले असून पुढील दोन तीन महिन्यांत या भागात अनेक विकास योजनांचे भूमिपूजन समारंभ आपण करणार आहोत असे आश्वासन या प्रसंगी विखे यांनी देऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आपल्या दारी आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी बोलताना आमदार बबनराव पाचपुते यांनी खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून जेष्ठ नागरिकासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून जे साहित्य वाटप केले त्याबद्दल आभार व्यक्त करून गोरगरीब, वंचित घटकासाठी आपण सातत्याने काम करावे अशा शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमात हजारो जेष्ठ नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने काठी, कमोड, चष्मा, वाॅकर, व्हिल चेयर, कमरेचा मानेचा बेल्ट इत्यादीचा समावेश होता.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!