कुकडीचे पाणी आणि भूसंपादनाचा मावेजा देणारच- खासदार सुजय विखे पाटील

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधि | दि.५ फेब्रुवारी २०२३ : अहमदनगर जिल्ह्याच्या हक्काचे कुकडीचे पाणी एवढेच नाहीतर कुकडीच्या भूसंपादनाचा मावेजा दिल्या शिवाय मी शांत बसणार नाही असे निर्धार खा.डाॅ.सुजय विखे यांनी व्यक्त करून पुणेकरांनी आता पर्यंत पंधरा टिएमसी पाण्याची चोरी केली आहे असा आरोप केला. ते श्रीगोंदा येथील खेतमाळीसवाडी, पारगाव येथील जनजीवन मिशन अंतर्गत येणारया ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार बबनराव पाचपुते हे होते तर व्यासपीठावर प्रताप सिंह पाचपुते,अण्णासाहेब शेलार, गणपत काकडे, बाळासाहेब नहाटा, शिवाजीराव जाधव ,रामदास ठोंबरे, तुषार काकडे, शंकर खेडेकर ,सखाराम जगताप, प्रा. निसार शेख, नानाभाई शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की मविआ सरकारच्या शेवटच्या बैठकीत सहा उपसा जलसिंचन योजना मंजूर करून नगरचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाला मात्र सत्तातंर झाले आणी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले, या सरकारने तीन महिन्यांपूर्वीच मागील सरकारने मंजूर केलेल्या योजनांना स्थगिती देऊन आपल्या जिल्हासाठी तीन उपसा जलसिंचन योजनांना मंजूरी दिली. एवढेच नाहीतर त्या सरकारने आपले हक्काचे १५ टिएमसी पाणी देखील पळवले होते. आता हे सर्वच आपण घेणार असून राज्य सरकार हे आपले आहे त्यामुळे आपल्या हक्काच्या सर्वच गोष्टी आपल्याला आता मिळणार असे सांगून कुकडीच्या भूसंपादनाचा प्रलंबित राहिलेल्या प्रश्नावर एक महिन्यात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या भागातील शेतकरयासाठी मोफत वीज आणि मोफत पाणी देण्यासाठी नव्याने काही योजना आखत असल्याचे खासदार विखे यांनी सांगताना शासन आपल्या दारी आणून आपल्याला शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे हे एक रूपायाही खर्च न करता देणार आहोत, यामुळे विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकरयाचे कल्याण होणार आहे असे सांगितले. मागील तीन महिन्यांत आपले सरकार आले आणि विकास हा आपल्यला दिसु लागला आहे , विकासाचा हा रथ असाच पुढे चालू द्यायचा असेल तर आपण सर्वांनी केंद्रात आणि राज्यात आपले सरकार येण्यासाठी आमच्या पाठीशी भक्कमपणानी उभा राहिले पाहिजे असे आवाहन केले.

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक विकास योजना, पाणी पुरवठा योजना, रस्ते याकामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!