टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.७ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्रातील दुर्गभ्रमंती, दुर्गसंवर्धन,गडकिल्ले प्लॅस्टिक स्वच्छता अभियान, महाराष्ट्र बारव मोहीम, व आपला ऐतिहासिक वारसा जतन करणारी संस्था म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेची जनमानसात ओळख आहे.शिवदुर्ग परिवाराचे नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास संशोधक अनिल दुधाने यांचे हस्ते पार पडले.श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते , लक्ष्मण महराज टकले,डॉ. विजय सरडे (पुणे) श्रीगोंदा नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घन:शाम शेलार, प्रसिद्ध उद्योजक अमित बगाडे, प्राथ.शिक्षक बँकेचे चेअरमन संदिप मोटे पाटिल,प्रतिभाताई पाचपुते, बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, संग्राम देशमुख,अनेक नगरसेवक,आदी मान्यवरांसह शिक्षक मित्र परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवदुर्ग परिवाराचे हजारों मावळ्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.
अनिल दुधाने म्हणाले प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले , युगायुगांचा अलौकिक ऐतिहासिक वारसा, गडकिल्ले , विरगळ, वेस, सतिशीळा मंदिरे, बारव जतन करण्यासाठी शिवदुर्गची तरुण पिढी कार्य करत आहे. आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवविचारांचा मुळ पाया भक्कम हवा.म्हणूनच वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा नगरीत राजेश इंगळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातुन शिवदुर्गचे सुंदर कार्यालय उभं राहिलंय.”
आमदार बबनराव पाचपुते म्हणाले ” शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने आपल्या मावळ्यांना, रणरागिनिंना हक्काची जागा उपलब्ध केली आहे!ही खूप मोठी ऐतिहासिक घटना घडली आहे. आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार झालो हे सर्वांचं भाग्य आहे. या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत.
युगायुगांचा वारसा जतन करणे आपले कर्तव्य आहे. शास्त्रोक्त पद्धतीने, पुरातन विभागाची आचारसंहिता पाळून ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी युवा पिढीने समाजात बदल घडवायला हवा असे डॉ. विजय सरडे यांनी सांगितले.
खूप मोठा पुरातन वारसा श्रीगोंदा तालुक्यात आहे.श्रीगोंद्याची प्राचीन पण नवी ओळख निर्माण करायची आहे.हे शिवधनुष्य पेलण्यास शिवदुर्ग परिवारातील सदस्य सज्ज झाले आहेत, असा यानिमित्ताने सर्वांनी ठाम निश्चय केला.
लोकक्रांती वृत्तांकन