टीम लोकक्रांती
कोळगाव प्रतिनिधी | दि.७ फेब्रुवारी २०२३ : अरणगाव ता. नगर येथील आनंदराव शेळके यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा उपप्रमुख (ग्रामीण) पदी निवड झाल्याबद्दल कोळगाव व आरणगाव चे ग्रामस्थांनी भव्य असा सत्कार केला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव हे होते.
आनंदराव शेळके एक मुत्सद्दी, राजकारणी व समाजसेवक म्हणून सर्वत्र ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण नगर तालुक्यात सातत्याने होत असतो. व आता जिल्हा उपप्रमुख पदी नियुक्ती मिळाल्याने त्यांच्या कार्यास संपूर्ण जिल्ह्यात वाव मिळणार आहे. असे जाधव यांनी यावेळी सत्कार करताना गौरव उद्गार काढले.
आनंदराव शेळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या जिल्हा उपप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल आरणगाव च्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांचा मंदिराचे विश्वस्त व कोळगाव येथील माजी मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास कोळगाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बाराहाते, शिंदे,ढमढेरे, खंडागळे, नाट, जाधव बाबा, कलापुरे व आरणगावचे तसेच कोळगावचे आजी माजी सरपंच, सोसायटीचे सदस्य व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन