टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.९ फेब्रुवारी २०२३ : नॅशनल सॅम्बो कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश केलेल्या येळपणे येथील श्री. खंडेश्वर माध्यमिक विद्यालयातील तीन खेळाडूंचा नगर- दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, जम्मू काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय सॅम्बो कुस्ती (sambo) चॅम्पियनशिप स्पर्धा ही स्पोर्टस कॉम्प्लेक्स स्टेडियम भगवती नगर या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या यामध्ये झाली.(sports) सॅम्बो कुस्ती या खेळामध्ये शिवराज जालिंदर धावडे याने किलो ४५ वजन गटात कास्य पदक मिळविले.तर ४७ किलो वजन गटात कु. समृद्धी जंबे हिने कास्य पदक तसेच ४२किलो वजन गटामध्ये कु.सोनाक्षी साबळे हिने गोल्ड मेडल मिळवुन घवघवीत यश संपादन केले. व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली
यामध्ये क्रीडा शिक्षक प्रा. राजेंद्र बारगुजे,प्रा. अनिल बाळासाहेब पठारे,सॅम्बो इंडिया असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव कुमार उघाडे, यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार,प्रतापसिंह पाचपुते, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब महाडिक, सचिन कातोरे, मिलिंद दरेकर, बेलवंडी गावचे युवा सरपंच ऋषिकेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कामगिरीबद्दल येळपणे जिल्हा परिषद गटाचे लोकनेते सतिश आण्णा धावडे, कुकडी कारखान्याचे व्हाचेअरमन विवेक आबा पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, ग्रामपंचायत सरपंच विनोद धावडे, उपसरपंच मानसिंग ठाणगे, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब पवार, महेंद्र थोरात, राजवर्धन वीर, अमोल पवार, आणा डफळ, सोसायटीचे चेअरमन भानुदास जगदाळे, व्हाचेअरमन आनंद खामकर, संचालक नवनाथ देवकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष रवी गावडे, उपाध्यक्ष निवास धावडे, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य शिक्षक शिक्षकेतर व कर्मचारी तसेच आजी – माजी ग्रामपंचायत सर्व सदस्य,आजी- माजी सोसायटीचे सर्व संचालक आदींसह ग्रामस्थांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लोकक्रांती वृत्तांकन