टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१२ फेब्रुवारी २०२३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत ३० जानेवारी २०२३ रोजी सोमनाथ भोपळे यांना फिजिक्स या विषया मध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर सोमनाथ भोपळे यांचे संशोधनाचे काम प्रोफेसर महेंद्र मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार ते पाच वर्षापासून Synthesis, Characterization and Field Emission of Topological Insulators या विषयावर संशोधन चालु होते.
तसेच संशोधन चालु असताना सोमनाथ भोपळे हे फिजिक्स या विषयामध्ये SET परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी संशोधनाचे शिक्षण हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुर्ण केले आहे.डॉक्टर सोमनाथ भोपळे हे नूतन मराठी माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेडगाव , ता. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कार्यरत असणारे रसायनशास्त्र प्रमुख प्राध्यापक पांडूरंग भोपळे यांचे धाकटे बंधू आहेत.
- भोपळे यांना पीएचडी मिळाल्यानंतर त्यांचे मार्गदर्शक आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरु यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांना फोन द्वारे शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक असताना सुद्धा इतके मोठे यश मिळवल्यानंतर सर्वांची मान अतिशय अभिमानाने उंचावली आहे.श्रीगोंदा तालुक्यात आणखी एक मनाचा तुरा रोवण्याचे काम भोपळे यांनी केले आहे. सर्व स्थरांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लोकक्रांती वृत्तांकन