टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१३ फेब्रुवारी २०२३ :
प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी विजय भंडारे यांना नियुक्तीपत्र दिले. बुधवार दि.८ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात याबाबत बैठक झाली. यात विजय बापूराव भंडारे (रा. वाटेफळ, ता. नगर) यांना दक्षिण जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली.
यावेळी समाजसेवक तात्या साठे, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, पै. जयदीप मगर, सोशल मीडिया अध्यक्ष शांतीलाल मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी तसेच सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पदाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे भंडारे यांनी नियुक्तीनंतर सांगितले.
लोकक्रांती वृत्तांकन