काष्टी येथील जनता विद्यालयाच्या १९९६ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न!

टीम लोकक्रांती
लिंपणगाव प्रतिनिधी | दि.१३ फेब्रुवारी २०२३ : जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा एस एस सी बॅच १९९६ मेळावा काष्टी येथील महेश्वर सभागृहात रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी आनंदात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सतीश जगताप हे होते.

जनता विद्यालयातील अनेक विद्यार्थी सध्या विविध शासकीय, खाजगी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत .प्रत्येकाला घडविण्यात विद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. हीच भावना मनात जागून १९९६ साली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व मित्र परिवाराला एकत्र करत, आपल्या गुरुजनांचा सत्कार करुन त्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.यासाठी शरद भोसले, प्रेम राहिंज व संतोष शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी जनता विद्यालयाचे प्राचार्य पंडित घोंगडे उपस्थित होते.माजी गुरुवर्यांपैकी एम. एस. लगड सर, एस. आर.शिर्के सर, जायभाय सर, महामुनी सर, गारुडकर सर, गायकवाड सर वाघमारे सर, माने सर, हिरवे सर, मेरुकर सर, जराड सर, करंजुले सर, रोडे सर, माने सर आदी उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांचा सन्मानचिन्ह ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रत्येकाने आपल्या शाळेविषयी असणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. शाळेबद्दल बोलताना माजी सेवकांनाही गहिवरून आले आणि आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराबद्दल प्रत्येकाने विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.

माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी देणगी जाहिर केली. यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संजय काळे यांनी सूत्रसंचालन केले तर गजानन जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरण संपन्न झाला.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
27.6 ° C
27.6 °
27.6 °
62 %
3.9kmh
66 %
Sat
27 °
Sun
32 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
33 °
error: Content is protected !!