टीम लोकक्रांती
कोळगाव प्रतिनिधी | दि.१३ फेब्रुवारी २०२३ : श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगाव ता. श्रीगोंदा येथील एन एम एम एस परीक्षेचा सन २०२२-२३ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये परीक्षेला बसलेल्या एकूण ५६ विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा शेकडा निकाल ८५.७१ टक्के लागला आहे.
श्री कोळाईदेवी विद्यालयातील इयत्ता आठवीसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत ४८ विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी मारली. त्यामध्ये दहा विद्यार्थ्यांनी ११५ पेक्षा जास्त गुण मिळविले तर १९ विद्यार्थ्यांनी शंभर पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख भोईटे एस पी, विषय शिक्षक शेळके के पी ,बोराडे आर एल, भोईटे एस पी , कळसकर एस एस, भंडारी के बी, गाडेकर व्ही ए, शिवरात्री ए आर यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगडे एच के, उपमुख्य्यापक जंगले आर एस, पर्यवेक्षक धुमाळ बी आर, तसेच स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक व शिक्षक पालक संघ, कोळगाव चे आजी माजी सरपंच, उपसरपंच , सदस्य ,सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक विद्यालयातील सर्व सेवक वृंद, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन